सिग्नलवर,फुटपाथवर, रस्त्यावर आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणारी, द्रवित करणारी परिस्थिति म्हणजे गाडीचा दरवाजा ठोठावणारी ओंगळवाण्या अवतारात दिसणारी, काहीतरी मागणारी कोवळी मुले…त्यांना पैसे दिले तर त्यांची ही “काहीतरी मागण्याची”वृत्ती वाढेल म्हणून पैसे देण्याचा विचार आपण थांबवतो आणि मग आपल्याकडे काही खायला असलेले त्यांना देतो पण आपण मात्र या मुलांसाठी काहीच नीट करू शकलो नाही या भावनेने आपले मन मात्र खात राहते…या मुलांचे भवितव्य काय? यांचे आयुष्य हे असेच राहील तर मग या मुलांच्या हक्कांचे,जे त्यांचे मूलभूत अधिकार (जगण्याचा,त्यांचे बालपण सुखी, सुरक्षित व आनंदी असण्याचा,शिक्षणाचा,विकासाचा,त्यांच्या अस्तित्वाचा,स्वातंत्र्याचा असे अनेक अधिकार.